। पनवेल । वार्ताहर ।
विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्या रोटी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे नुकत्याच मोठ्या दुर्घटनेतून सावरलेल्या इर्शाळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 अत्याधुनिक सायकली भेट स्वरुपात देण्यात आल्या.
प्रांतपाल डिस्ट्रीक्ट 3131 डॉ.गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीचे प्रेसिडंट रोटरीयन शैलेश पोटे, सेक्रेटरी रोटरीयन दिपक गडगे, ट्रेझरर रोटरीयन ॠषिकेश बुवा व सर्व्हीस प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरीयन सुदीप गायकवाड यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत इर्शाळवाडी येथे जावून गरजवंत विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षणासाठी दररोज पायपीट करून शाळेत जावे लागते व पुन्हा घरी परतावे लागते अशा विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अशा 10 सायकली भेट देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे आभार मानले.