| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अलोजी भगत यांचे सोमवार, दि. 28 ऑगस्ट रोजी निधन झाले. निधनसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐश्वर्या इंटरप्राईजेसचे संजीवकुमार भगत, पत्रकार राजकुमार भगत, सामाजिक कार्यकर्ते विजय भगत यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा आप्तपरिवार आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी विविध प्राथमिक शाळांवर विद्यादानाचे कार्य केले. गणित आणि मराठी या विषयात ते पारंगत होते. त्यांची बंधू मास्तर या नावाने ओळख होती.







