| उरण । वार्ताहर ।
उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी एस.पी.वाठारकर यांची नियुक्ती होताच त्यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ आपल्या कार्यालयातील कर्मचारी वर्गाला शिस्तीचे धडे दिले आहेत. तसेच परिसरातील केर कचरा काढण्यास सुरुवात केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
गेली अनेक महिने उरण पंचायत समितीचा कार्यभाळ हा प्रभारी गटविकास अधिकार्यांच्या हाती असल्याने या कार्यालयाला अनेक समस्यांनी वेढले होते. त्यामुळे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी असावा, अशी मागणी सातत्याने उरणकरांकडून करण्यात येत होती. रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदी एस.पी.वाठारकर यांची शासनाने सोमवारी (दि.10) नियुक्ती केली. त्यांनी कार्यालयाचा आढावा घेऊन कर्मचारी वर्गाला शिस्तीचे धडे दिले. तसेच कार्यालयातील व परिसरातील केर कचरा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पंचायत समिती कार्यालयात, परिसरात केर कचरा विखुरलेल्या अवस्थेत पडून राहिल्याने सध्या तो काढण्याचे काम हाती घेतले आहे. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान राबविण्याचा कानमंत्र प्रत्येक देशवासीयांना दिला आहे. त्याचा एक भाग म्हणून सध्या कार्यालयात, परिसरात स्वच्छता मोहीम राबवित आहोत
एस.पी.वाठारकर
गटविकास अधिकारी उरण पंचायत समिती