। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठेत तुंबलेल्या गटाराच्या कामाला अखेर नगरपंचायत प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. तळा बसस्थानकाशेजारी तळा नगरपंचायतीचे जवळपास अकरा गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांच्या समोर लागूनच वाहत असलेल्या गटाराची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्ती व साफसफाई करण्यात आली नव्हती. परिणामी या गटाराची दुरवस्था होऊन हे गटार पूर्णपणे तुंबल्याने गटारातील सर्व सांडपाणी गाळेधारकांसमोर साचून पुढे रस्त्यावर वाहत होते. या गाळे धारकांकडे खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना या सांडपाण्यातून यावे लागत होते. तसेच या सांडपाण्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत होते. त्यामुळे हे गटार पूर्णतः नव्याने बांधण्याची मागणी होत होती. या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.