| नेरळ | वार्ताहर |
कर्जत येथील महार्मावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, ठेकेदाराकडून प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्याही उपाययोजा करण्यात येत नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यात रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच, कर्जत महार्मावर अशी कामे सुरु असताना रात्रीच्या वेळी सूचना देणारे फलक देखील नसल्याने चालकांसाठी रात्री प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. दरम्यान, ठेकेदारांकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.