| खांब-रोहे,। वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील खांब विभाग क्रिकेट असो.च्या सहकार्याने व धाकेश्वर देवकान्हे यांच्या वतीने संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत धाक्सूद चिल्हे संघाने सर्वोत्तम कामगिरी करून आपले विजेतेपद पटकावले. बाहे येथील क्रीडा मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन वसंत भोईर यांच्या हस्ते झाले. यावेळी सूरज कचरे, सुरेश जंगम, अनंत थिटे, नारायण कान्हेकर, दिलिप कान्हेकर, नितीन भोईर, रवींद्र कान्हेकर, रोहिदास सुटे आदी मान्ववर उपस्थित होते. या स्पर्धेत उपविजेते पदाचा मान शिरवली संघाने पटाकावला तर गावदेवी मुठवली संघाने तुतीय क्रमांक पटकावला तसेच स्पर्धेतील मालिकवीर म्हणून सनील खांडेकर, तर उत्कृष्ट फलंदाज स्वप्निल कापसे व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संकेत लहाने यांंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खांब क्रिकेट मंडळाच्या मार्गदर्शनाखाली धाकेश्वर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.