तळेगांवात परसबाग किटचे वाटप

| पाताळगंगा | वार्ताहर |

महाराष्ट्र शासन कृषि विभाग संपूर्ण राज्यभरात कृषि संजीवनी सप्ताह खालापूर तालुक्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तळेगाव व पानशिल येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मिरची, काकडी, वांग, दुधी, कारले अदिचे मिनी किट बियाणे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महिला वर्गांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक नितिन महाडिक यांनी शेतकर्‍यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, आंतरपीक भाजीपाला लागवड, तसेच महाडिबीटी अंतर्गत विविध योजना, इ. बाबत मार्गदर्शन केले.

Exit mobile version