। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांच्याकडून तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यात संवाद आणि वाकस येथील जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थी उपयोगी साहित्य भेट देण्यात आले.
नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या ट्रू वर्शिप संस्थेच्या वाकस येथील जिल्हा परिषद शाळेसाठी एलईडी संच, शालेय शैक्षणिक साहित्य, ऑफिस खुर्च्या भेट देण्यात आल्या. तर, सलवड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी ऑफिस कपाट, धान्य कोठ्या, खुर्च्या, शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य भेट देण्यात आले. यावेळी ट्रू वर्शिप संस्थेच्या विश्वस्त अनिता तसेच श्री साई ट्रस्टच्या संचालिका राधिका घुले यांच्या सहकार्याने आणि तालुक्यातील बेकरे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप घुले यांचे सहकार्य राहिले. या कार्यक्रमांना मुख्याध्यापिका चौधरी, शिक्षक जोगदंड, तांबे, मंगेश वैखरे, महेश वैखरे तसेच मुख्याध्यापिका करंदीकर, शिक्षक मोडक, झांजे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कदम आदी उपस्थित होते.