। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
साहित्यसंपदा समूह संस्थापक वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून नवरात्र काळात महिला विशेष उपक्रम साजरा झाला. आत्मनिर्भर होण्यासाठी शाररिक, आर्थिक, मानसिक बळ गरजेचे असते हे हेरून विविध मार्गदर्शनपर वर्गांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.सोनाली मनीष वनगे, मुस्कान झाटम, विलास सोनावणे, प्रांजली मोहिते, सिद्धेश गंगावणे, डॉ दिनेश गुप्ता आदीनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सर्व कार्यक्रम विनामूल्य साहित्यसंपदा फेसबुक समूहावर आपल्याला कधीही कुठूनही पाहता येतील. उपक्रम समन्वयक म्हणून वंदना मत्रे आणि सलोनी बोरकर ह्यांनी काम पाहिले.







