| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी (दि.16) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 चे वेळापत्रक जाहीर केले. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या स्पर्धेचा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होईल. अंतिम सामना 25 मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. 23 मार्च रोजी आयपीएलचा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना खेळला जाईल. आयपीएलच्या 18व्या हंगामात 65 दिवसांत 13 ठिकाणी एकूण 74 सामने खेळवले जातील. यामध्ये नॉकआउट फेर्यांचाही समावेश आहे. या काळात 22 मार्च ते 18 मे या कालावधीत 70 लीग फेरीचे सामने खेळवले जातील. त्याचवेळी, अंतिम सामन्यासह सर्व प्लेऑफ सामने 20 ते 25 मेदरम्यान खेळवले जातील.