। खरोशी । वार्ताहर ।
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमतः सेझ विरोधी संघर्ष समितीची सभा अॅड. नंदू म्हात्रे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या सभेला सुमारे 50 सभासद उपस्थित होते. संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील व माजी सचिव आर.के. पाटील यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली. त्यामुळे खारे पाट, हमरापुर विभाग, साई विभाग यामध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता. तो भरून काढण्यासाठी आणि येणारे गेल पाइप लाइन, तिसरी महामुंबई, सेझ, मेट्रो, प्रकल्प, विरार अलिबाग कॉरिडॉर, कांदल वन, वनखात्याचे हवाई पाहणी अशे अनेकप्रश्न भविष्यात उद्भवणारे आहेत.त्याचा सामना करायचे झाल्यास शेतकरी वर्गाची शक्ती एकत्रित राहिली पाहिजे. तरच शेतकरी वाचेल ही भूमिका या सभेत मांडण्यात आली. तसेच, कोणताही लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत सेझ जमिनी ताब्यात देण्यात यशस्वी झाला नाही, हा नाराजीचा सुर होता. त्यामुळे आत्ता आपण एकसंघ राहून आपले प्रश्न सरकार दरबारी ठामपणे मांडले पाहिजे. असे मत या बैठकीत मांडण्यात आले आहे.