। पुणे । प्रतिनिधी ।
मगरपट्टा मेगासेंटरच्या आवारात व्यावसायिकाच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख 30 हजार रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे.
याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तक्रारदार सासवड-हडपसर रस्त्यावरील वडकी नाला भागात राहणारे असून त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते गुरुवारी दुपारी सव्व्वादोनच्या सुमारास कामानिमित्त मगरपट्टा मेगासेंटरमध्ये आले होते. मेगासेंटरच्या आवारातील वाहनतळावर त्यांनी कार लावली होती. कारमधील कप्प्यात त्यांनी पाच लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. काही वेळाने काम आटोपून ते वाहनतळावर आले. तेव्हा कारची काच फोडून चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.