कोकणात तुळशी विवाहाची धामधूम सुरू
| आगरदांडा | प्रतिनिधी |
कोकणात तुळशीच्या लग्नाची आणि पावसाने ओढ दिल्याने भातकापणीची त्यातच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने डोअर टू डोअर स्थानिक कार्यकर्त्यांसह सर्व उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. तर, एकीकडे तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे.
कार्तिकी एकादशीनंतर दुसर्या दिवसापासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत होईपर्यंत शहरातील आळी आळीतुन तर गावा गावात विवाहाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याकरिता काही ठिकाणी पारंपरिक वृंदावन मातीने तयार करुन तर नव्या युगातील सिमेंटच्या तुळसी वृंदावनाला रंगरंगोटी करण्याची लगबग पहावयास मिळत आहे. बाजारपेठेमध्ये झेंडुची फुले, आवळे, चिंचा, खडके, ऊस, विवाहासाठी लागणार्या विविध वस्तूंचे स्टॉल जागोजागी थाटले असून, त्याला खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे.