| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
भाजप नेते समरजित घाटगे यांनी मंगळवारी कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कागलमध्ये पार पडला. पक्षप्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत समजित घाटगे यांनी पवार गटाची तुतारी हाती घेतली. या पक्षप्रवेशानंतर समरजित घाटगे यांचं विधानसभेचं तिकीट पक्कं झाल्याचं बोलले जात आहे.