| रसायनी | प्रतिनिधी |
वाशिवली येथून वीस वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. नंदिनी विनोद चुनियाने (20) ही घरातून काही वस्तू आणण्यासाठी वाशिवली बाजारात जात असल्याचे सांगून निघून गेली ती घरी परतली नाही. याबाबत नातेवाईकांशी शोध घेतला असता ती अद्यापही सापडली नाही. ती रंगाने सावळी, अंगाने मध्यम, उंची 5 फूट, चेहरा उभट, डोळे काळे, अंगात गुलाबी रंगाचा सलवार सुट, उजव्या हातात भगवान शंकराचा धागा बांधलेला, पायात गोल्डन व गुलाबी रंगाची चप्पल असे वर्णन असून रसायनीचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना कोमल पाटील अधिक तपास करीत आहेत. कोणाला संबंधित तरूणी आढळल्यास रसायनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






