। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात केंद्र सरकारने कामगारांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणार्या कामगारांना ई-श्रम पोर्टलवर रजिस्टर करुन ओळखपत्र देण्यात येईल. पीएम जन आरोग्य योजनेतंर्गत आरोग्य सुविधा दिली जाईल. जवळपास 1 कोटी गिग कामगारांना याचा लाभ मिळेल.
डिलिव्हरी बॉईजसाठी मोठ्या घोषणा
झोमॅटो, स्विगी, फ्लिफकार्ट, बिग बास्केट अशा अनेक दिग्गज कंपन्या या क्षेत्रात आहेत. मात्र, या क्षेत्रात काम करणारे डिलिव्हरी बॉईज, गीग वर्कर यांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नाही. मात्र, आता या सर्व कामगारांचा नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यात येणार आहे. याशिवाय गीग वर्कर्ससाठी सरकार आरोग्य विमा योजना आणणार आहे.
शहरी कामगारांना कर्ज मिळणार
पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत कर्जाची मर्यादाही अर्थसंकल्पात वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की पीएम स्वानिधी योजना बँकांकडून वाढीव कर्जाची घोषणा केली आहे. 30,000 रुपयांच्या मर्यादेसह यूपीआय लिंक क्रेडिट कार्ड आणि क्षमता निर्माण सहाय्याने सुधारित केली जाणार आहे.