| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्यसभेचे माजी सदस्य संभाजी राजे छत्रपती यांनी शिकागो येथे भारतीय तिरंगा फडकावला. 15 ऑगस्ट, 2023 रोजी, शिकागो येथे भारतीय अमेरिकन लोकांसह भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. संभाजी राजे हे सध्या शिकागोच्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्या निमंत्रणावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला भेट देत आहेत. यूएसए मधील भारतीयांची ही सर्वात मोठी संस्था आहे. शिकागोच्या भूमीत आणि यूएसए च्या मध्य-पश्चिम भागात तीन लाखाहून अधिक सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारतीय अमेरिकन लोकांचे प्रतिनिधित्व करते. हि संस्था 1980 पासून कार्यरत आहे. ज्येष्ठ काँग्रेस सदस्य डॅनी डेव्हिस, काँग्रेस सदस्य राजा कृष्ण मूर्ती, सोमनाथ घोष, भारताचे यूएसए मधील कौन्सिल जनरल, हे देखील स्वातंत््रय दिनाच्या उत्सवात सहभागी झाले होते. संभाजी राजे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी 13 ऑगस्ट रोजी, शिकागो येथील एफआयएच्या मेजवानीला हजेरी लावली होती. येत्या काही दिवसांत ते वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीसह अन्य अनेक अमेरिकन शहरांनाही भेट देणार आहेत.