| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील तिसे गावचे माजी पोलीस पाटील बाळकृष्ण बिरगावले यांच्या पत्नी मालती बिरगावले यांचे अल्पशा निधन झाले. निधनसमयी त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील असंख्य नागरिक, कोलाड रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच समस्त तिसे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले, सुना, नातवंडे व मोठा बिरगावले परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवारी, 30 सप्टेंबर रोजी, तर उत्तरकार्य विधी बुधवारी, 2 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत.