| तळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा क्रीडा विभाग आयोजित तळा तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी यांच्या हस्ते व्हॉलिबॉल तर शाळा समितीचे चेअरमन महेंद्र कजबजे यांच्या हस्ते बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक महादेव लोकरे, पी पी कसबे, बागुल सर, परीक्षक किशोर देशपांडे, सुहास वावेकर, महाडकर सर, दौडमनी सर, तुषार देशपांडे, तळा तालुक्यातील क्रीडा शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
बुद्धिबळ व व्हॉलीबॉल स्पर्धेत गो म वेदक विद्यामंदिर, पढवण हायस्कूल, पिटसई हायस्कूल, एस एस निकम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळा आदी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 31 ऑगस्ट मुलींच्या कबड्डी व खोखो स्पर्धा, 1 सप्टेंबर मुलांचे कबड्डी व खोखो स्पर्धा, 2 सप्टेंबर रोजी मुले व मुलींच्या मैदानी स्पर्धा पार पडणार आहेत. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी व चेअरमन महेंद्र कजबजे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. किशोर देशपांडे, सुहास वावेकर, महाडकर सर, बागुल सर व दौडमनी सर, मचे मॅम यांनी बुद्धिबळ व व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उत्तम काम पाहिले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव लोकरे तर निवेदन व आभार सुहास वावेकर यांनी केले.