पीकपाण्याचे नियोजन बिघडण्याची भीती
| तळा | प्रतिनिधी |
अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे तळा तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरवर्षीप्रमाणे व शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडला तरी एवढा पडत नसल्याने अंदाजानुसार पाऊस जास्तच होत आहे. शेतीवर याचा परिणाम होण्याचा धोका शेतकरी वर्गातून व्यक्त होते.
अवकाळीमुळे धुळवाफे पेरणीचा मुहूर्त हुकला असून, शेतीचे नियोजन बिघडले असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात धुळवडीचे राब करण्याचे काम 24 मेपासून चांगला मुहूर्त काढून शेतकरी कामाला सुरुवात करत असतो. मात्र, सध्या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. तालुक्यात खरिप हंगामात भाताचे क्षेत्र सरासरी 1031 हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात पिकाची सरासरी प्रति हेक्टरी 2372 किलो इतकी उत्पादकता आहे. यावर्षी 2025-26 या खरिप हंगामासाठी कृषी विभागाने तालुक्यात 1200 हेक्टवर भात पिक घेण्याचे नियोजन केले आहे. तर, हेक्टरी 2900 किलो भाताचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.