प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
| उरण | प्रतिनिधी |
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेला काही वर्षे झाली असतानाच, आता मुंबईपासून जवळ असणारा तालका म्हणजे उरण. या तालुक्यातील विविध भागात औद्योगिकीकरण वाढले आहे. यामुळे येथील शेतीला सोन्याचे भाव आले आहेत. पण, या औद्योगिकीकरणाचे जाहिरात करणारे मोठ मोठे होर्डिंग खासगी जागेत लागलेले दिसतात. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रशासनाच्या दुर्लपणामुळे अनेक अपघात होत आहेत. अशीच एक घटना उरण तालुक्यातील वशेणी गावात दि. 12 मे रोजी घडली. शेतामध्ये लावलेले अनधिकृत होर्डिंग पडून तीने गुरे जखमी झाल्याची माहिती ग्रा.पं. सदस्य संग्राम पाटील यांनी दिली. तरी, तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग लवकरात लवकर काढावे, अशी विनंती प्रशासनाला करणार असून, हे होर्डिंग न काढल्यास स्वतःहून ते काढण्यात येतील, असा इशारा संग्राम पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.